‘अखईं तें जालें : तुकाराम – हिंदुस्थानी परिवेशात’ या ग्रंथाचे दोन्ही खंड अनेक वर्षांच्या ‘तुकारामगाथे’च्या झाडाझडतीचे फलित आहे!

तुकाराम समजून घेण्यासाठी कोणत्या परंपरा समजून घ्यायला हव्यात, याचे उत्तर नेमाडे यांच्या ‘तुकाराम’ या पुस्तकात मिळाले. भक्तिआंदोलन आरंभी कदाचित प्रादेशिक स्वरूपाचे असावे, पण ते केवळ विशिष्ट प्रदेशापुरते सीमित न राहता, त्याचा प्रभाव कालांतराने संपूर्ण हिंदुस्तानामध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये वरकरणी भिन्न असलेल्या अनेक परंपरांचे योगदान होते. तेव्हा तुकाराम ‘हिंदुस्तानी परिवेशात’ समजून घ्यायला हवे.......